गहू उत्पादनाच्या क्षेत्रात वाढ होणार

कृषिकिंग : या वर्षी पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे, परंतु  रब्बी हंगामाकडून शेतकऱ्यांना चांगल्या अपॆक्षा आहेत. रब्बीच्या पेरण्यास सुरवात झाली आहे. राज्यात प्रत्येक भागात पाऊस चांगला झाल्याने पाण्याच्या उपलब्धतेत वाढ झालेली दिसून येत आहे. लोकांचा कल या वर्षी गहू आणि हरभरा उत्पादनावर जास्त असून ज्वारी आणि मका पिकाचे क्षेत्र गहूच्या तुलनेत कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मका उत्पादनामध्ये अमेरिकन फॉल आर्मी वर्म्स मुले लागवडी कमी होत आहे.  पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लक्ष क्विंटल बियाणाची मागणी आली आहे. आता पर्यंत ६५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने गहू, हरभरा, ज्वारी या पिकांचा अंतर्भाव होत आहे. विभागातील नगर जिल्ह्यातील रब्बीची पेरणी अंतिम टप्प्यात आली असून गेल्या ४ ते ५ दिवसांपासून थंडी सुरु झाल्याने गहू आणि हरभरा पिकाच्या लागवडीस सुरवात झाली आहे.

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पेरण्या उशिरा होत असल्या तरी रब्बीच्या क्षेत्रामध्ये गेल्या २ वर्षाच्या तुलनेत वाढ दिसून येत आहे. यामुळे बी-बियाणे खरेदी मध्ये वाढ होत आहे. गेल्या वर्षी (२०१८-१९ ) मध्ये देशातील गहू उत्पादन १०१ दशलक्ष टन इतके झाले होते, यामद्ये १.३ % उत्पादन वाढले होते, यावर्षी सुद्दा (२०१९-२०) मध्ये गहू उत्पादन चांगले होईल, असा अंदाज तज्ञ व्यक्त करत आहेत.

चालू घडामोडी आणि बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृषिकिंग वेबसाईट ला भेट द्या

Read Previous

लष्करी अळीमुळे मका लागवडी रखडल्या

Read Next

एकरी २५ हजार मदतीसाठी किसान सभेचा आंदोलनाचा इशारा