कोंबड्यांचे संरक्षण व खाद्य व्यवस्थापन

कृषिकिंग: खाद्य व्यवस्थापन-
– परसातील कोंबड्यांसाठी सहजपणे उपलब्ध होणारे धान्य मका, ज्वारी, बाजरी दळून आणून आपण खायला घालू शकतो. तसेच स्वयंपाकघरातील कचरा, कीटक, धान्य इ. पक्ष्यांच्या खाद्यात वापरता येते. 
– अंडी उत्पादनासाठी जीवनसत्त्व व खनिजे खूप महत्त्वाची असतात. त्यामुळे बाजारात तयार मिळणारे खाद्य २५-४० ग्रॅम प्रतिपक्षी प्रतिदिन संरक्षणात्मक खाद्य म्हणून देणे फायदेशीर ठरते. 

पक्ष्यांचे संरक्षण:
– परसातील कुक्कुटपालनामध्ये सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे रानटी प्राण्यांपासून पक्ष्यांचे संरक्षण. 
– परसबागेतील पक्ष्यांसाठी फार मोठी घरे किंवा शेडची गरज पडत नाही. हे पक्षी दिवसा मोकळे सोडले जातात. परंतु रात्री त्यांना निवारा द्यावा लागतो. यासाठी १ x १.२ चौ. मी. व उंची ०.७६२ मी. लाकडी पिंजरा केल्यास त्यात १०-१५ कोंबड्या रात्रीच्या वेळी ठेवता येतात. 

-डॉ. माणिक धुमाळ,
पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी.

Read Previous

कृषीदिंडी – देखोनि पुराणिकाची दाढी

Read Next

कृषी शिक्षण : भारतातील सर्वोच्च शेती उत्पादक राज्य