केळीच्या दरात मोठी घसरण

कृषिकिंग, बऱ्हाणपूर : उत्तर भारतातून घटलेली मागणी आणि वाढलेली आवक यामुळे केळीचे दर घसरले आहेत. खानदेशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये रमजानच्या काळात प्रतिक्विंटल 1400 रूपयांच्या घरात असणारे केळीचे दर आता 900 ते 1000 रूपयांवर उतरले आहेत. बाजारसमितीने जाहीर केलेले हे दरही प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे. सध्या उत्तर भारतात तपमान जास्त असल्यामुळे तेथील व्यापाऱ्यांकडून केळीला मागणी घटली आहे.
परंतु खानदेशातील केळी उत्पादक पट्ट्यात मागील वर्षी जुलैमध्ये लागवड केलेल्या बागांमधून केळीची काढणी वेगात सुरू आहे. केळी नाशवंत असल्याने लगेच विक्रीसाठी बाहेर काढावी लागते. त्यामुळे सध्या बाजारात आवक वाढली आहे. रावेर बाजारपेठेत सध्या दररोज 300 ट्रक (एक ट्रक 15 मेट्रिक टन क्षमता) केळीची आवक होत आहे. तर प्रदेशातील बऱ्हाणपूर बाजारात दररोज साडेतीनशे ट्रक केळीची आवक होत आहे. बाजारसमितीने जाहीर केलेल्या भावात केळीची खरेदी न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे.

Read Previous

आत्महत्या करू नका… कृषिमंत्री आणि सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Read Next

पिक सल्ला: कापूस