कृषी निर्यायीत मोठी घट

कृषिकिंग: देशाच्या कृषी निर्यातीत मोठी घट झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कृषी निर्यात १०.६१ टक्के घसरली आहे. यंदा पहिल्या तिमाहीत २८ हजार ९१० कोटी रूपये किंमतीच्या शेती उत्पादनांची निर्यात झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ३२ हजार ३४१ कोटी रूपयांची निर्यात झाली होती.
अपेडाने दिलेल्या माहितीनुसार यंदा पहिल्या तिमाहीत बासमती तांदळाची निर्यात गेल्या वर्षीच्या ११७ लाख टनांवरून ११५ लाख टनांवर उतरली आहे. बिगर बासमती तांदूळ आणि कडधान्य निर्यातीला सर्वाधिक फटका बसला आहे. बिगर बासमती तांदळाची निर्यात २१ लाख टनांवरून थेट १२ लाख टनांवर आली आहे. तर कडधान्यांची निर्यात १.०१ लाख टनांवरून ४५ हजार ३४४ टनांवर घसरली आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करायचे असेल तर कृषी निर्यात वाढली पाहिजे. आम्ही कृषी निर्यातीसाठी स्वतंत्र, सर्वंकष धोरण आखले आहे. या धोरणाचे पालन करावे आणि कृषी निर्यातीला चालना द्यावी, अशा सूचना आम्ही राज्य सरकारांना दिल्या आहेत. निर्यात वाढली तरच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल,
असे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Read Previous

आजचे अंड्याचे दर- रु/शेकडा

Read Next

सिंचनामुळे मॉन्सूनला उशीर?