कृषीदिंडी २०१९ – जें का रंजलें गांजलें

जें का रंजलें गांजलें । त्यासि म्हणे जो आपुलें ॥१॥
तो चि साधु ओळखावा । देव तेथें चि जाणावा ॥ध्रु.॥
मृदु सबाह्य नवनीत । तैसें सज्जनाचें चित्त ॥२॥
ज्यासि आपंगिता नाहीं । त्यासि घरी जो हृदयीं ॥३॥
दया करणें जें पुत्रासी । ते चि दासा आणि दासी ॥४॥
तुका म्हणे सांगूं किती । तो चि भगवंताची मूर्ती ॥५॥- संत तुकाराम
निरुपण :-जे दुःखी कष्टी, प्रापंचिक त्रासाने गांजले आहेत, त्याना जो आपले म्हणतो. तोच खरा साधू म्हणून ओळखावा आणि त्याच्या ठिकाणी देव समजावा. अशा साधुचे चित्त अंतर्बाह्य लोण्याहून मऊ असते. ज्याला आधार नाही, जो निराधार आहे, त्याला आपल्या ह्रदयाशी धरतो. जे प्रेम आपल्या पुत्रावरती करतो, तेच प्रेम तो आपल्या दास दासींवर करतो. तुकोबा म्हणतात, असे संतसज्जन म्हणजे साक्षात भगवंताची मूर्तिच असते; यापेक्षा अधिक काय सांगू ? || रामकृष्ण हरी ||

Read Previous

अंड्याचे दर रु/शेकडा

Read Next

पिक सल्ला : हळद