कापूस सल्ला: नत्राचा तिसरा हप्ता देऊन कीडनियंत्रक उपाय करा

कृषिकिंग: कापूस पिकात एक तास आड सरी काढावी जेणेकरून जास्तीच्या पाण्याचा निचरा होईल, कोरडवाहू कपाशीसाठी हेक्टरी ७८ किलो व बागायतीसाठी १३० किलो नत्राचा तिसरा हप्ता युरीयामधून द्यावा. पिकावरील रसशोषण करणाऱ्या तसेच फुलकिडीच्या नियंत्रणासाठी फिप्रोनील ५ टक्के २० मिली किंवा फलोनिकॅमिड ५० टक्के ३ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

-कृषी हवामानशास्त्र विभाग,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.

Read Previous

निकृष्ट चाऱ्यामुळे म्हशीवर होणारे परिणाम

Read Next

आजचे अंड्याचे दर- रु/शेकडा