कापूस सल्ला: आकस्मिक मर प्रतिबंधक उपाय

कृषिकिंग: मागील काही वर्षा्ंचा पावसाचे एकंदर स्वरुप व प्रमाण पाहता आपल्या असे लक्षात येर्इल की एकदम एक ते दोन दिवसात अतिवृष्टि होते.अतिवृष्टि झालेल्या भागातील जमिनीवर बऱ्याच काळापर्यंत पाणी साचून राहिल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत कपाशीची झाडे पावसाच्या पाण्यात बुडून राहिल्यास प्रकाश संश्लेषण कमी होते व अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावल्यामुळे झाडे मलूल होतात व सुकू लागतात. यालाच ‘आकस्मिक मररोग’ (parawilt) असे संबोधतात.पिकांवरुन पुराचे पाणी वाहून गेल्यानंतर वापसा येताच झुकलेली झाडे झुकलेल्या बाजूकडून मातीचा भर देऊन सरळ करावीत.शेतातील साचलेले पाणी चर काढून त्वरित शेताबाहेर काढून टाकावे. सखल भागातील पाण्याला वाट करुन द्यावी. झाडाचे खोड ढिले झाले असल्यास खोडाभोवती पायाने माती दाबून भर द्यावी, जेणेकरुन झाड वाकू नये.

-डॉ. प्रशांत डब्ल्यु. नेमाडे आणि डॉ. टि. एच. राठोड.
कापूस संशोधन विभाग,डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

Read Previous

जनावरातील संसर्गजन्य आजार: फऱ्या

Read Next

आजचे अंड्याचे दर- रु/शेकडा