कांदा सल्ला: सूक्ष्मअन्नद्रव्यांची फवारणी करून कीड व रोग नियंत्रण करावे

कृषिकिंग: खरीप कांद्याच्या उभ्या पिकात फवारणीद्वारे सूक्ष्मद्रव्ये 5 मिली/लिटर या प्रमाणात पुनर्लागणीनंतर 45-60 आणि 75 दिवसांनी द्यावीत.नत्राच्या कमतरतेमुळे पाने पिवळी पडली असल्यास, युरियाची 10 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी.
फुलकिडे व पानांवरील रोग यांचा पूर्णपणे बंदोबस्त होत नसेल तर प्रोफेनोफॉस (1 मिली प्रति लिटर) अधिक हेक्साकोनॅझोल (1 ग्रॅम प्रति लिटर) यांची फवारणी करावी. त्यानंतर आवश्यकता वाटल्यास फिप्रोनील (1 मिली प्रति लिटर) अधिक प्रोपीकोनॅझोल (1 ग्रॅम प्रति लिटर) यांची फवारणी पूर्वीच्या फवारणीनंतर 15 दिवसांनी करावी.

-डॉ. शैलेन्द्र गाडगे, डॉ.ए.थंगासामी, डॉ.मेजर सिंह.
भाकृअनुप-कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर, पुणे.

Read Previous

अशी करा जातिवंत गोपैदास…

Read Next

आजचे अंड्याचे दर- रु/शेकडा