कडकनाथ प्रकरणी राजू शेट्टी ‘ईडी’कडे

कृषिकिंग : कडकनाथ कोंबडीच्या नावाखाली शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली आहे. त्यामुळे कंपनीच्या संचालकांची आणि या प्रकरणातील इतर दोषींची त्वरित चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ईडीकडे केली आहे. राजू शेट्टी यांनी मुंबई येथे ईडी च्या कार्यालयात विभागीय विशेष महासंचालक श्री. सुशीलकुमार यांची समक्ष भेट घेऊन कडकनाथ प्रकरणात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारीचा पाढा वाचला. तसेच दोषी व्यक्तींची मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांचे पैसे त्वरीत परत देण्यात यावेत, असे निवेदनही या वेळी दिले.

महारयत अ‍ॅग्रो इंडिया कंपनी कडून संपूर्ण महाराष्ट्रात कडकनाथ कोंबडी पाळा व कोट्यधीश व्हा, असे आश्वासन देवून लोकाकडून प्रचंड पैसा गोळा केला. सुमारे ५०० कोटी रुपयांची फसवणूक केली गेल्याची चर्चा आहे. या प्रकरणात ईडीचे सुशीलकुमार यांनी सांगितले की, लवकरात लवकर ईडीकडून सर्व संचालक व संबंधितांच्या संपत्तीला टाच लावून संपत्ती ताब्यात घेणार असून या महिन्यानाअखेरपर्यंत ही कारवाई सुरू करू.

Read Previous

कोंबड्यांचे लसीकरण : ०१

Read Next

कोंबड्यांचे लसीकरण ०३