ऊस सल्ला: सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करा

कृषिकिंग:   ऊस पिकात माती परीक्षणाच्या आधारे जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास प्रति हेक्टरी 25 किलो फेरस सल्फेट, 20 किलो झिंक सल्फेट, 10 किलो मँगनीज सल्फेट आणि 5 किलो बोरॅक्स ही सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते चांगल्या कुजलेल्या शेणखतात 10:1 प्रमाणात मिसळून 2 ते 3 दिवस मुरवून सरीमध्ये चरी घेवून मातीआड करावीत. स्फुरदयुक्त खतांसाठी सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर केल्यास गंधक या सूक्ष्म अन्नद्रव्याची वेगळी मात्रा द्यावी लागणार नाही.

-डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. मृणाल अजोतीकर,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव.

Read Previous

आजचे अंड्याचे दर- रु/शेकडा

Read Next

पावसाळ्यातील पशु-व्यवस्थापन: प्रजनन