ऊस सल्ला: आडसाली उसाला खताची दुसरी मात्रा द्या

कृषिकिंग: सहा ते आठ आठवडे वयाच्या आडसाली ऊस लागणीसाठी को.86032 जातीसाठी शिफारशीत (500:200:200 किलो नत्र, स्फुरद, पालाश) खतमात्रेच्या 40 टक्के नत्र खताची दुसरी मात्रा देण्यासाठी 435 किलो युरिया (200 किलो नत्र) तर इतर जातीसाठी शिफारशीत (400:170:170 किलो नत्र, स्फुरद, पालाश) खतमात्रेच्या 40 टक्के नत्र खताची दुसरी मात्रा देण्यासाठी 350 किलो युरिया (160 किलो नत्र) प्रती हेक्टरी वापरावी. तसेच सदरची खतमात्रा देताना 6 किलो युरियासाठी 1 किलो निंबोळी पेंडीची भुकटी चोळून द्यावी.

डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. मृणाल अजोतीकर,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव.

Read Previous

संतुलीत पशुआहारातील पाण्याचे महत्व

Read Next

वासरांच्या झपाट्याने वाढीसाठी प्रथिनांचे महत्व…