आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला उठाव नाही

कृषिकिंग: अमेरिका आणि चीनमधील व्यापार युध्द आणि जागतिक अर्थकारणाची मंदावलेली गती यामुळे कापसाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेला मरगळ आलेली आहे. त्याचा फटका भारतालाही बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अमेरिका हा जगातील सर्वाधिक कापूस निर्यातदार देश आहे तर चीन हा सर्वाधिक कापूस आयातदार देश आहे. या दोन देशांमधले व्यापारी संबंध सध्या ताणलेले आहेत. त्यामुळे कापसाच्या मागणीत घट होऊन दर उतरणीला लागले आहेत.
गेल्या वर्षी चीनने अमेरिकेतील कापसावर 25 टक्के कर लावला. परिणामी चीनकडून खरेदी कमी झाली. त्यामुळे अमेरिकेतील कापसाच्या दरात मोठी पडझड झाली. दुसऱ्या बाजूला चीनमध्ये सुध्दा कापसाचे दर घसरले. कारण चीन हा अमेरिकेला तयार कपड्यांचा पुरवठा करणारा आघाडीचा देश आहे. अमेरिकेने शुल्क वाढवल्यामु्ळे ही निर्यात घटली. त्यामुळे चीनची कापसाची मागणी घसरली. त्यामुळे दर उतरले. अभ्यासकांच्या मते अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुध्द एवढ्यात शमण्याची चिन्हे नाहीत. त्याचा प्रतिकूल परिणाम कापसाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर होणार आहे.
चीनमध्ये कापसाची उत्पादकता अधिक आहे. परंतु गेल्या काही वर्षांत आशिया आणि आफ्रिकेतील कमी उत्पादकता असलेल्या देशांमध्ये कापूस लागवडीचा कल वाढला आहे. त्याच प्रमाणे कपडे निर्मितीचा उद्योग चीनच्या तुलनेत बांगलादेश आणि व्हितएनामसारख्या देशांमध्ये वाढीस लागला आहे.
भारतात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाची लागवड किंचित वाढण्याची शक्यता असली तरी उत्पादनात घट अपेक्षित आहे. निर्यात रोडावण्याची शक्यता असून कापसाचे दर कमी राहण्याचा अंदाज आहे.

Read Previous

आजचे अंड्याचे दर- रु/शेकडा

Read Next

कोल्हापुरात पावसाची विश्रांती