अशी करा जातिवंत गोपैदास…

कृषिकिंग: उच्च प्रतीची जातिवंत जनावरे- जातिवंत गोपैदास
जातिवंत (उच्च कुलीन ) किंवा भरपूर दूध देणारी अशी गाय तुम्हाला कोणी बाजारात विकताना दिसणार नाही. ती आपल्याला आपल्या गोठ्यामध्येच निर्माण करावी लागेल. त्यासाठी ब्रीडिंग प्रोसेस (रेतन प्रक्रिया) आपण नियंत्रित केली पाहिजे.
त्यामध्यी कालवडीला २७५ ते ३०० किलो वजन होईपर्यंत रेतन न करणे, उच्च प्रतीच्या बैलाचे वीर्य वापरून कृत्रिम रेतन करणे, सर्व गाईंना टॅगिंग (नंबर चे बिल्ले लावणे) करणे, रेतन केल्याची नोंद आपल्या नोंदवहीत लिहिणे, एकाच वंशावळीत त्याच त्याच बैलाचे वीर्य न वापरणे इत्यादी गोष्टी येतात.
या जातिवंत गाईची काळजी देखील त्याच प्रकारे अतिशय लक्षपूर्वक घेतली पाहिजे. तिला वेळोवेळी लसीकरण केले पाहिजे. तिचे सड आयोडीन मध्ये बुडवून काढले पाहिजेत. कोणत्याही प्रकारे दगडी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
उच्च प्रतीचा हिरवा चारा तिला नेहमी खाऊ घातला पाहिजे. मुक्त गोठ्या मध्ये गव्हाण बांधून तिला तिच्या वेळापत्रकानुसार खायची आणि पाणी प्यायची व्यवस्था केली पाहिजे.

Read Previous

सोयाबीनच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता

Read Next

कांदा सल्ला: सूक्ष्मअन्नद्रव्यांची फवारणी करून कीड व रोग नियंत्रण करावे