अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न् दुप्पट वाढणार

कृषिकिंग : शेती क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे शेती क्षेत्राचा चेहरामोहरा बदलून शेतकऱ्यांचे उद्दीष्ट दुप्पट होण्याचा संकल्प पूर्ण होईल, असा विश्वास केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी व्यक्त केला. ते राज्यसभेत बोलत होते. शेती क्षेत्रामध्ये कृत्रिम बुध्दिमत्ता, बिग डेटा अॅनालिसिस, ब्लॉक चेन तंत्रज्ञान आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) आदी अत्याधुनिक तत्रज्ञानाचा वापर सुरू होईल. हीच भविष्याची दिशा असेल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ करण्याचे उद्दीष्ट पूर्ण होईल, असे तोमर म्हणाले.

तसेच यासंबंधीच्या समस्यांवर तोडगे काढण्यासाठी आंतरमंत्रालयीन समिती स्थापन करण्यात आली असल्याचेही त्यांनी सभागृहाला सांगितले.शेतकऱ्यांना किसान सुविधा मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून हवामान, बाजारभाव, पिकसंरक्षण, निविष्ठा पुरवठादार, शेती यांत्रिकीकरण, जमिनीचे आरोग्य आदी विषयांची माहिती दिली जात आहे, असेही तोमर यांनी स्पष्ट केले.

Read Previous

एचटीबीटी कापसाचा मुद्दा पोहोचला संसदेत

Read Next

कर्जमाफीः तक्रारदार शेतकऱ्यालाच अटक